➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖
📅 📅 📅
दिनांक - : ०८.१०.२०१६
वार -: शनिवार
〰➖〰➖〰➖〰〰➖〰➖
🌻🌻🌻
*दिनांक - ०८ ऑक्टोबर २०१६*
*तिथी – आश्विन शु. ॥७॥ शके १९३८*
*वार – शनिवार*
〰➖〰➖〰➖〰➖〰➖〰
🌷🍁🌻
*१) राष्ट्रगीत*
🌷🍁🌻
*२) प्रतिज्ञा*
🌷🍁🌻
*३) भारताचे संविधान*
➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖
🗒🗒🗒
*४) दिनविशेष*
*हा या वर्षातील २८१ वा (लीप वर्षातील २८२ वा) दिवस आहे.*
🗓🗓🗓
*ठळक घटना आणि घडामोडी*.
🌻२००१ - सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंडळाची स्थापना केली.
🌻१९८२ - पोलंडने ’सॉलिडॅरिटी’ व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.
🌻१९६२ - अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
🌻१९६२ - नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित ’तो मी नव्हेच’ या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.
🌻१९५९ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय ‘डी-लिट’ पदवी घरी येऊन दिली.
🌻१९३९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.
🌻१९३२ - ’इंडियन एअर फोर्स अॅरक्ट’ द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.
*जन्म /जयंती /वाढदिवस*
🌹१९३५ - मिल्खा सिंग – ’द फ्लाइंग सिख’
🌹१९२८ - नील हार्वे – ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू
🌹१९२६ - कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता (मृत्यू: ३ जुलै १९९६)
🌹१९२२ - गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ वैज्ञानिकांना मिळणारे बहुतेक सर्व राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले.
🌹१८९१ - शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. १९२० मधे त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. ’शंवाकिय’ हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे.
🌹१८५० - हेन्रीर लुईस ली चॅटॅलिअर – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ
🌹१९२२ - गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन, संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ. वैज्ञानिकांना मिळणारे बहुतेक सर्व राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले.
*मृत्यू/स्मृतीदिन /पुण्यतिथी*
💐१८८८ - कवी, प्राचीन भारतीय वाङ्मयाचे अभ्यासक व षड्दर्शनज्ञ महादेव मोरेश्वर कुंटे यांचे निधन. ‘षड्दर्शन चिंतनिका’ आणि ‘व्हिसिटय़ूडस ऑफ आर्यन सिव्हिलायझेशन इन इंडिया’ या ग्रंथांमुळे जगात (विशेषत युरोपात) त्यांचा नावलौकिक झाला. याशिवाय, ‘राजा शिवाजी’ मराठी साहित्यात आणण्याचा प्रयोग त्यांनी केला. ‘ऋषी’ या ७७० ओळींच्या काव्यातून चार हजार वर्षांपूर्वीचे आर्यजीवन त्यांनी चितारले होते.
💐१९३६ - धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्या व ३०० कथा लिहील्या. त्यांचे २४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले.
💐१९७९ - ’लोकनायक’ जयप्रकाश नारायण, स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान
💐१९८० - श्रीपाद शंकर खानवेलकर यांचे निधन. ‘तथागत’, ‘योगमाया’, या कादंबऱ्या व ‘बुद्धधर्म आणि संघ’, ‘श्री गुरुदत्तयोग’ ही पुस्तके त्यांनी लिहिली.
💐१९९६ - गोदावरी परुळेकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी सनद मिळवली. तलासरी, डहाणू, शिरगाव या भागातील डोंगरदर्यांत फिरून वारल्यांच्या पिळवणुकीचे अनुभव त्यांनी ऐकले व आदिवासींमधे जागृतीचे कार्य केले. ’जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे.
🌷🍁🌻
*५) व्यक्तीविशेष*
👳🏻♀👳🏻♀👳🏻♀
*गाडगे महाराज*
जन्म:फेब्रुवारी २३, १८७६
शेणगाव अंजनगाव, कोल्हट सुर्जी तालुका, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू:२० डिंसेंबर १९५६
वलगांव (अमरावती)
गाडगे महाराज यांचे मुळ नाव डेबुजी झिग्राजी जानोरकर असुन ईश्वर कशात आहे याची नेमकी जाणीव असलेले संतआणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
🍁🌷🌻
*६) सामान्य ज्ञान :-*
*लोहगड*
लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकरने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे.त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड. लोहगडावरून पवनेच्याधरणाचे सुंदर दृश्य दिसते. पलीकडेच तिकोना उर्फवितंडगड नावाचा अजून एक किल्ला आहे. तुंग उर्फकठीणगडही येथेच आहे. अंदरमावळ आणि पवनमावळ यांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे.
🍁🌷🌻
*७) सुविचार*
१ ) मानवाला अभिमान असावा.परंतु अहंकार नसावा.
२ ) किंमत ती असते जी तुम्हाला मिळवावी लागते.आणि मुल्य ते असते ते तुम्हाला मिळते.
३ )खरे मित्र हे हि-याप्रमाणे असतात.मिळविण्यासाठी वेळ लागतो.
🍁🌷🌻
*८) म्हणी*
नावडतीचे मीठ अळणी
अर्थ- नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही.
🍁🌷🌻
*९) बोधकथा –*
एकदा एक १० वर्षाचा मुलगा आईस्क्रीमच्या दुकानात गेला.
तो टेबलाजवळ बसला आणि त्याने वेटरला विचारलं, "आईस्क्रीम कोन केवढ्याला आहे?"
वेटर म्हणाला, "५ रुपये".
तो मुलगा हातातील नाणी मोजू लागला.
नंतर त्याने आईस्क्रीमचा लहान कप केवढ्याला, असं विचारलं.
वेटरने ञासिकपणे उत्तर दिलं, "४ रूपये."
तो मुलगा म्हणाला मला आईस्क्रीमचा लहान कप द्या.
त्या मुलाने आईस्क्रीम खाल्लं, बिल दिलं आणि तो गेला.
वेटर त्याचा रिकामा कप उचलायला गेला आणि त्याला जे दिसलं त्याने त्याचं मन हेलावून गेलं.
कपाजवळ १रुपया त्याने टीप म्हणून ठेवला होता.
आईस्क्रीमची ऑर्डर देण्यापूर्वी त्या लहान मुलाने त्या वेटरचा विचार केला होता.
त्या मुलाने संवेदनक्षमता आणि कदर करण्याची वृत्ती दाखवली होती.
स्वतःचा विचार करण्यापूर्वी त्याने इतरांचा विचार केला होता.
💠 *तात्पर्य -* कधीतरी दुस-याचा विचार करावा.
*१० ) आजची बातमीधारा*
🌷🍁🌻
*११ ) आजचा उपक्रम – कवायत .*
🌷🍁🌻
*१२ ) आजचे वाढदिवस*
🌷🍁🌻
*१३ ) समूहगीत/देशभक्तीपर गीत*
🌷🍁🌻
*१४ ) पसायदान*
🌷🍁🌻
➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖
🌷🍁🌻
ENGLISH
*Assembly of 8th October*
📕📘📙Ⓜ💲🅿📕📗📙
➖➖
➖ *08* / *10* / *2016* ➖
➖ *Saturday* ➖
‼ *Routine Assembly* ‼
‼ *परिपाठ* ‼
➖➖
0⃣1⃣
🎯 *National Anthem - राष्ट्रगीत* 🎯
➖➖
0⃣2⃣
🎯 *Pledge - प्रतिज्ञा* 🎯
➖➖
0⃣3⃣
🎯 *Preamble - घटनेची प्रस्तावना* 🎯
⚜ *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ⚜
➖➖
0⃣4⃣
🎯 *Prayer - प्रार्थना* 🎯
May there be peace on earth.
May the waters be appeasing.
May herbs be wholesome, and may trees and plants bring peace to all.
May all beneficent beings bring peace to us.
May all things be a source of peace to us.
⚜ *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ⚜
➖➖
0⃣5⃣
🎯 *Day & Date वार व तारीख* 🎯
Today is *Saturday* , *8* th of *October* 2016
⚜ *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ⚜
➖➖
0⃣6⃣
🎯 *Good Thought - सुविचार* 🎯
Be The Peace You Wish To See In The World!- Martin Luther King Jr.तुम्ही जी शांती जगात पाहू इच्छिता,ती स्वत:त आणा-मार्टीन लुथर किंग.
🎯 *Day's Special - दिनविशेष* 🎯
√ *Indian Air Force Day*
√ Massive earthquake of 7.6 magnitude hits Pakistan killing 70,000 people. 2005.
√ Alexander Solzhenitsyn-Russian author wins Nobel Prize for his book 'Gulag Archipelago'.1970.
√ Lokmanya Jayaprakash Narayan passes away.1978.
⚜ *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ⚜
➖➖
0⃣8⃣
🎯 *Proverb - म्हण* 🎯
A rolling stone gathers no moss-घरंगळणार्या दगडाला शेवाळ लागत नाही.
(People say this to mean that an ambitious person is more successful than a person not trying to achieve anything. Originally it meant the opposite and was critical of people trying to get ahead.)
⚜ *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ⚜
➖➖
0⃣9⃣
🎯 *Phrase - वाक्प्रचार* 🎯
Belt out--(Sing something loudly)मोठ्याने गायण करणे.
They BELTED OUT the national anthems before the game.खेळानंतर त्यांनी मोठ्या आवाजात राष्ट्रगीत गायण केले.
⚜ *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ⚜
➖➖
1⃣0⃣
🎯 *Synonyms समानार्थी🎯
√Abandon=Chuck=Desert. त्यागणे.
√Baffle=Blight= Thwart.निष्फळ करणे
⚜ *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ⚜
➖➖
1⃣1⃣
🎯 *Antonyms विरूध्दार्थी*🎯
√Abandon त्यागणे× Reserve.राखून ठेवणे
√Baffle निष्फळ करणे× succeed यशस्वी होणे
⚜ *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ⚜तुटपुंजा
➖➖
1⃣2⃣
🎯 *Homonyms समउच्चारी*🎯
√ hairकेस~ hareससा.
√oneएक~wonजिंकला.
⚜ *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ⚜
➖➖
1⃣3⃣
🎯 *Parable बोधकथा* 🎯
Patience Pays :
Once, a king had announced that anyone who wanted the post of personal assistant must meet him. Many people gathered in the palace. The king led them to a pond and said, "Whoever will fill this pond's water in this pot will be chosen for the post. But remember, there is a hole in the pot."
So some people left without a single try. While some people tried for once and then said, "The king has already chosen someone else. Let's go."
But one man kept filling the pot with pond water patiently. He filled the water in the pot from the pond and came out on the ground. But always within few moments, the water poured on the ground completely. He tried that uncountable numbers of times. At last the pond became empty. The man found a diamond ring in the empty pond and he gave it to the king. At this the king said, "This ring is a reward for your patience and hard work. You are fit for the job."
So the man confirmed that patience pays.
⚜ *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ⚜
➖➖
1⃣4⃣
🎯 *General Knowledge* 🎯
*Indian Geography* ---
Climate of India---
A) India has mansoon climate.
B) Indian mansoon are basically two types:
a. South-West Mansoon in summer
b. North-East mansoon in winter
C) Factors affecting Indian Climate are:
a. Orientation of mountain range
b. Variation of pressure in summer and winter
c. Jet stream in northern hemisphere at height altitude of 6-10km.
D) India has a large variation in climate from region to region, due to its vast size. India experiences climate from four major climate groups
a. Tropical wet (humid) climate group
i. Tropical wet (dry,humid)
ii. Tropical wet and dry or savannah climate
b. Dry climate group
i. Tropical semi-arid (steppe) climate
ii. Sub-tropical arid (desert) climate
iii. Sub-tropical semi-arid (steppe) climate
c. Sub-tropical humid climate group
i. Sub-tropical humid (wet) with dry winters
ii. Mountain climate or highland climate or alpine climate
⚜ *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ⚜
=====