Viisiter

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

Sunday, 28 August 2016

Inspire Aword 2016

आजचा परिपाठ

➖〰➖〰➖〰➖〰➖〰

📅 📅 📅

*दिनांक - २९.०८.२०१६*

*वार सोमवार*

〰➖〰➖〰➖〰〰➖〰➖

🍁🍁

*दिनांक – २९ ऑगष्ट २०१६*

*तिथी – श्रावण क्रु १२ शके १९३८*
*वार – सोमवार*
➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖
🍁🍁🍁

*१) राष्ट्रगीत*

*२) प्रतिज्ञा*

*३) भारताचे संविधान*

➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖

*४) दिनविशेष - :*

📅📅📅

*२९ ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिन*
*हा या वर्षातील २४१ वा (लीप* *वर्षातील २४२ वा) दिवस आहे.*

महत्त्वाच्या घटना:
१९४७:डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष झाले.
१९१८:लोकमान्य टिळक यांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
१८९८:’गुडईयर’ कंपनीची स्थापना झाली.
१८३३:युनायटेड किंगडमने आपल्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.
१८३१:मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electromagnetic Induction) शोध लावला.
१४९८:वास्को द गामाने कालिकतहुन पोर्तुगालला परतण्याचा निर्णय घेतला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९०५:मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीपटू
१९०१:पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील – सहकारमहर्षी
१८८०:लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
२००८:जयश्री गडकर – अभिनेत्री
२००७:बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री
१९८६:गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
१९७६:काझी नझरुल इस्लाम – स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक
१९६९:मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर
१९०६:बाबा पद्मनजी मुळे – ख्रिस्ती धर्मप्रसारक, ग्रंथकार व मराठी ख्रिस्ती वाङमयाचे अभ्यासक .

➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖

👳🏻👳🏻👳🏻

*५) व्यक्ती विशेष*

मेजर ध्यानचंद
हॉकी म्हटले की मेजर ध्यानचंद हे नाव सर्वात प्रथम डोळ्यांसमोर येते. त्यांचे शिक्षण फक्त ६ वी पर्यंतच. हरणा-या ०-२ अशा संघातर्फे खेळत ४ गोल करत संघाला जिंकवणा-या ध्यानचंदला १६ व्या वर्षीच सैन्यात शिपाई म्हणून भरती होण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय पातळीवरही अगदी शेवटच्या ४ मिनिटात ३ गोल करत ०-२ च्या पिचाडीवरच्या संघास विजयश्री मिळवून दिल्यामुळे त्यांना भारतीय संघातून खेळण्यासाठी निवडण्यात आले. १९२६ च्या नुझीलंड दौ-यात एकूण २१ सामने खेळणा-या भारतीय संघातर्फे १९२ गोल झाले त्यातील १०० गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते. १९२८ साली झालेल्या ऑल्मपिक हॉकीत भारत अजिंक्य ठरला. स्पर्धेच्या पाच सामन्यात भारतावर एकही गोल झाला नव्हता. उलट भारताने २९ गोल केले होते. १९२८ च्या ऑमस्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात नॅदरलेंड विरुद्ध ३-० अशा जिंकलेल्या सामन्यात, ३ पैकी दोन गोल ध्यानचंद होते. १९३२ च्या लॉस एन्जलीस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेस तर २३ - १ अशा फरकाने भारताने हरवले. हा उच्चांक २००३ पर्यंत अबाधित होता. त्यातील ध्यानचंदने ८ गोल केलेले होते. हंगेरी विरुद्ध ४-०, अमेरिका ७-०, जपान ९-० असा प्रवास करत फ्रान्स विरुद्ध १०-० असा जिंकला तर जर्मनी विरुद्ध ८-१ असा जिंकल. हिटरने त्यांच्या सैन्यात वरच्या हुद्द्यावर दिलेली नोकरी त्यांनी स्वाभिमानाने आणि देशप्रेमामुळे नाकारली.
ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप. ध्यानचंद यांना १९५६ साली पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले. आज ते हयात नाही पण त्यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा भारतात खेल दिन ( National Sport Day ) म्हणून साजरा होतो.
➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖

🍁🍁🍁

*६) सामान्य ज्ञान*

🎓🎓🎓

०१)इमू – हा पक्षी उलट्या दिशेने चालू शकतो.
०२)उल्हास – ठाणे जिल्ह्यातील सर्वात लांब नदी.
०३)ईश्वरचंद्र विद्यासागर – विधवा विवाह कायद्याचे जनक.
०४)उग्रसेन - कंसाचा पिता, मथुरेचा यादव राजा.
०५)उटी – निलगिरी पर्वतातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण.
०६)उत्तरा – महाभारतातील अभिमन्यूच्या पत्नीचे नाव.
०७)उत्साद इशा – ताजमहाल या वास्तुचा शिल्पकार.
०८)उदयपूर – राजस्थान मधील शुभ्रनगरी शहर.

➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖
🍁🍁🍁

*७) सुविचार*

१) जे आपण विचार करतो, तेच बनत जातो.
२) विचार करूनही फायदा होत नसेल, तर खरंच विचार करायला हवा.
३) असं काम करा की नाव होऊन जाईल नाही तर असं नाव करा की लगेच काम होवून जाईल.
➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖
🍁🍁🍁

*८) म्‍‍हणी*
१. काम ऩ धंदा, हरी गोविंदा. – ज्या व्यक्तीला कामधंदा नसतो.तो नेहमी उपदेशपर गोष्टी करित असतो.
२. चिलटांची लढाई आणि नुसती बडाई. – प्रसिद्धिची भुकेलेली लोक लहानसहान गोष्टींनाही खुप मोठ्या करुन संगतात.
➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖
🍁🍁🍁

*९) बोधकथा -*

उंटाचे प्रथमदर्शन
एका प्रदेशातील लोकांनी उंट पहिल्यांदाच पाहिला. तेव्हा त्याचे ते विचित्र रूप पाहून ते भिऊन पळून गेले. पण पुढे त्यांना कळले की त्याच्यापासून काही अपाय नाही. हा तर अगदीच गरीब प्राणी आहे. तेव्हा ते त्याला कामासाठी खूप राबवू लागले. त्याच्या पाठीवर मोठमोठी ओझी लादून त्याला उन्हातान्हात दूरदूर हिंडवू लागले.

💠 *तात्पर्य -*

प्रथमदर्शनी एखाद्या गोष्टीचे माणसाला भय वा कौतुक वाटते पण नंतर मात्र ती गोष्ट त्याला इजा करणारी नसल्यास तीचा दुररुपयोग सुद्धा करतो.

➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖

🍁🍁🍁

*१० ) आजची  बातमीधारा*

. 📰 🗞 📰
         
       

〰➖〰➖〰➖〰➖〰➖〰
*आज दि*- २९-०८-२०१६

       *वार*- सोमवार     

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔯 १) तृप्ती देसाई यांचा हाजी अली दर्ग्यात प्रवेश  .  

🔯२)पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा : मोदी

🔯३)१ सप्टेंबर पर्यंत टॅक्सी -रिक्षाचा संप मागे .

🔯४)मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर ड्रोण कॅमेऱ्यांची नजर .

🔯५)जी . एस .टी मुद्यावर ठाकरे बंधूची युती

🔯६)दहीहंडी आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा कसा काय लागतो ? राज ठाकरेंचा सरकारला सवाल.

🔯७) जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावरील चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज .

🔯८)कश्मीरच्या धोरणावर उद्धव ठाकरेंची टीका .

🔯९)ऑलम्पिकवीरांना सचिनच्या हस्ते बी .एम .डब्ल्यू .कार भेट .

🔯१०)मोदीकडून साक्षी ,दीपा सिंधू ,ललिता बाबरचे कौतुक , तसेच मेजर ध्यानचंद यांना आदरांजली .

➖➖➖🙏🏻🙏🏻🙏🏻➖➖➖➖

🍁🍁🍁

*११ ) आजचा उपक्रम – क्रीडा स्पर्धा आयोजन.*

🍁🍁🍁

*१२ ) आजचे वाढदिवस*

🍁🍁🍁

*१३ ) समूहगीत/देशभक्तीपर गीत*

🍁🍁🍁

*१४ ) पसायदान*

➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖

🌻🌻🌻

Monday, 22 August 2016

आजचा परिपाठ

. 💠  💠  💠

➖〰➖〰➖〰➖〰➖〰

📅 📅 📅

*दिनांक - २३.०८.२०१६*

*वार :मंगळवार*

〰➖〰➖〰➖〰➖〰➖〰

*तिथी – श्रावण कृ ०६ शके १९३८*

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

*१) राष्ट्रगीत*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

*२) प्रतिज्ञा*

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

*३) भारताचे संविधान*

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

*४) दिनविशेष*

🔯हा या वर्षातील २३५ वा (लीप वर्षातील २३६ वा) दिवस आहे.

     *महत्त्वाच्या घटना*

🌹२०१२:राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार!
🌹२००५:कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान
🌹१९९७:हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला.
🌹१९९०:आर्मेनियाने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
🌹१९६६:‘लूनार ऑर्बिटर-१‘ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.
🌹१९४२:दुसरे महायुद्ध – स्टालिनग्राडची लढाई सुरू
🌹१९१४:पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
🌹१८३९:युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.

*जन्मदिवस/जयंती/वाढदिवस*

💠१९७३:मलाईका अरोरा - खान – मॉडेल व अभिनेत्री
💠१९५१:नूर – जॉर्डनची राणी
💠१९४४ :सायरा बानू – चित्रफट अभिनेत्री
💠१९१८:गोविंद विनायक तथा 'विंदा' करंदीकर – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार
💠१७५४:लुई (सोळावा) – फ्रान्सचा राजा

*मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन*

💐१९९४:आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला
💐१९७५:पं. विनायकराव पटवर्धन – नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते.
💐१९७४:डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक.
💐१९७१:रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट

🌻🌻🌻

*५) व्यक्तीविशेष*
     
          *विंदा' करंदीकर*

      गोविंद विनायक तथा 'विंदा' करंदीकर – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ’अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले. विंदाचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्त
ी घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली. विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर आणि मुलगी सौ.जयश्री विश्वास काळे हेसुद्धा सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांना नंदू आणि उदय असे दोन मुलगे आहेत. विंदानी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला. (मृत्यू: १४ मार्च २०१०)

🌻🌻🌻

*६) सामान्य ज्ञान*
  
      ➖पेटंट किंवा एकस्व➖

      सरकारने एखाद्या संशोधकाला त्याचे नवीन व उपयुक्त शोध किंवा निर्मिती सार्वजनिक करण्यासाठी देण्यात येणारी अनन्य प्रकारची सवलत किंवा अधिकार याला पेटंट किंवा एकस्व म्हणतात. हा अधिकार मर्यादित काळासाठी दिला जातो. पेटंट बौद्धिक मालमत्तेचा एक प्रकार आहे. या अनन्य प्रकारच्या सवलतीमुळे किंवा अधिकारामुळे तो इतरांना आपल्या शोधाच्या उपयोगापासून कायदेशीररीत्या प्रतिबंध करू शकतो. सरकारतर्फे मिळालेला अनन्य प्रकारचा हक्क नवशोधापासून होणार्या निर्मितीपुरताच व सरकारने निर्दिष्ट केलेल्या काळापुरताच मर्यादित असतो. उपयुक्त गोष्टींची प्रगती साधता यावी, नवशोधास उत्तेजन मिळावे, लोकांना नवशोधापासून फायदा घेण्याची संधी मिळावी व नवशोधाची माहिती गुप्त न राहता सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचावी हा एकस्व-अधिकार देण्यामागे शासनाचा हेतू असतो.एकस्व-अधिक
ार प्रदान करण्यापूर्वी शोधाची उपयुक्तता ठरविणे बर्याच बाबतींत अशक्य असल्यामुळे समाजात त्याचा वापर अनैतिक मार्गाने होणार नाही ना व त्याचा वापर करून प्रत्यक्षात नवीन निर्मितिक्रिया अस्तित्वात येते ना, ह्यांचा विचार करूनच शासन एकस्व-अधिकार देण्यास तयार होते. एकस्व-अधिकाराची कालमर्यादा निरनिराळ्या राष्ट्रांत वेगवेगळी आढळते. उदा., अमेरिकेची संयुक्त संस्थाने – १७ वर्षे, जपान – १५ वर्षे, युनायटेड किंग्डम – १६ वर्षे, जर्मनी – १८ वर्षे, फ्रान्स – २० वर्षे व भारत – १४ वर्षे.एकस्व मिळाले म्हणजे ते विधिग्राह्य होतेच, असे नाही. एकस्वीने एकस्वाच्या उल्लंघनाविरूध्द एखाद्यावर दावा लावला, तर प्रतिवादीला एकस्वाच्या विधिग्राह्यतेबद्दल हरकत घेता येते; मात्र विधिग्राह्यतेच्या प्रश्नावर केवळ उच्च न्यायालयेच निर्णय देऊ शकतात.

🌻🌻🌻

*७) सुविचार*

१) आनंदी राहायच असेल तर अपेक्षा स्वतः कडून ठेवा, समोरच्यांकडून नव्हे.
२) केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा .
३) दिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात, असे समजावे.

🌻🌻🌻

*८) म्हणी*

१. ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी. – ज्याचेकडुन आपणास फायदा होतो,त्याचेच काम करावे.
२. दूरून डोंगर साजरे. – दुरुन दिसणा-या ब-याच गोष्टी प्रत्यक्षात तशा नसतात.

🌻🌻🌻

*९) बोधकथा*

      बऱ्याच दिवसानंतर बादशाहाला आपल्या सरदाराची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली .त्याने आपल्या सरदाराना माजरीची गोजिरवाणी पिल्लू दिली .
तो म्हणाला आज पासून बरोबर सहा महिन्यांनी हि पिल्लू घेऊन दरबारात यायच आहे. ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशाह कडून मोठ बक्षीस दिल जाईल .प्रत्येक सरदार आपलेल्या मिळाल्या मांजराचे पिल्लू घेऊन घरी गेले .घरातल्या माणसाना त्यांनी बादशहा नि लावलेल्या बक्षीस बदल सांगितले.मांजराला चांगली मिठाई व दुध खाऊ पिऊ घाला अशी घरतल्या माणसांना सूचना दिली .प्रत्येक सरदाराच्या घरी सरदाराच्या घरी मांजराना खुराक चालू झाला .हळू हळू मांजराच्या अंगावर तेज येऊ लागल ती चांगली गुबगुबीत दिसू लागली .मात्र बिरबलान आपलेल्या मिळालेल्या असा खुराक दिला नाही.घरातल्या साध्या अन्नावर त्याला वाढवील उंदीर पकडायला शिकवलं बिरबलाचे मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झाले .मात्र ते हडकुळे राहिले .
अकबर बादशाहने एक चांगला दिवस ठरवून सर्व सरदारांना आपआपली मांजर दरबारात घेऊन यायला सांगितले .प्रत्येक जन आपआपली मांजर घेऊन दरबारात आला. अकबरान सर्व मांजरा वरून नजर फिरवली .बिरबलाच्या हातातील हडकुळे मांजर पाहून बादशाहाला हसू आले.आपले हसू दाबीत बादशहा म्हणाला "बिरबल सर्व सरदाराची मांजर गुबगुबीत दिसत असताना तुझे मांजर हडकुळे का ? बिरबल आपल्या मांजरी वरून हात फिरवत म्हणाला "खाविंद आपण मांजराची परीक्षा तर घ्या .उंदीर पकडन हे मांजराचे काम आहे .त्यात ते पटाईत असायला हवे .बादशाहने मान हलवली आणि नोकराला दरबारात उंदीर सोडायला सांगितले पंधरा वीस उंदीर दरबारात धाऊ लागले .प्रत्येक सरदाराने त्या दिशेने आपली मांजर सोडली .बिरबलाच्या मांजराने तर बिरबलाच्या हातातून उडी मारली .ते उंदराच्या मागे सुसाट धावत सुटले .त्याने दोन तीन उंदीर मारले देखील इतर गलेलठ मांजरे फक्त आपल्या गोंडेदार शेपट्या फुगवून तशाच जागेवर बसून पाहून लागली. त्यांनी फक्त आपल्या मिशा फेंदारल्या होत्या आणि अंग फुगविले होते.सरदार त्यांना पुढे ढकलत होते. परंतु जागेवरून हलण्याची तयारी नव्हती .बादशाहने बिरबलच्या मांजराला श्रेष्ठ ठरवून बिरबलाला भल मोठ बक्षीस दिले
💠 *तात्पर्य* मुलांना ज्ञानाची आवष्यकता असते,पोपटपंचीची नाही .

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*११ ) आजचे वाढदिवस*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*१२) समूहगीत*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*१३) पसायदान*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🌻🌻🌻

Saturday, 20 August 2016

शब्दतारका भाग १ (PDF)

click hareDownload

Sunday, 14 August 2016